पैगंबर शेख यांचे आवाहन: मराठा बांधवांना मदतीसाठी मशिदी खुल्या करा!
पुणे (प्रतिनिधी): मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव मुंबईत मोठ्या संख्येने येत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत पैगंबर शेख यांनी मुस्लीम समाजाला भावनिक आवाहन केले आहे.
पैगंबर शेख म्हणाले, "मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा बांधव मुंबईत येत आहेत. या मराठा बांधवांना जी जी मदत लागेल ती नक्की करा. पावसाचे दिवस आहेत. पावसात भिजणाऱ्या आंदोलकांना थांबण्यासाठी आपल्याकडील मशिदी खुल्या करा. ही आपली माणसं आहेत..."
त्यांच्या या वक्तव्यातून सामंजस्य व सामाजिक सौहार्दाचा संदेश देण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या समाजघटकांनी एकमेकांना मदत करण्याचे आवाहन हे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
पुण्यातील पैगंबर शेख यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक सलोख्याचा संदेश देणारे हे पाऊल म्हणून त्याची चर्चा रंगत आहे.
0 टिप्पण्या