पंढरपूर झोपडपट्टीधारकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा
पंढरपूर (प्रतिनिधी):
पंढरपूर शहरातील घोषित झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेचा (PMAY) लाभ मिळावा, अशी मागणी बहुजन हितकारिणी सभेचे अध्यक्ष रवी सर्वगोड यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंतप्रधान आवास योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांच्यासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत घरबांधणीसाठी अनुदान तसेच गृहकर्जावरील व्याज सवलत मिळते. मात्र, पंढरपूरमधील अनेक घोषित झोपडपट्टीधारक कुटुंबांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशी खंत श्री. सर्वगोड यांनी व्यक्त केली.
“पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून येथे विविध समाजघटकांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. विशेषतः मुस्लिम, ओबीसी, मराठा आणि इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे झोपडपट्ट्यांमध्ये हालाखीच्या परिस्थितीत राहतात. त्यांना गृहनिर्माणाची सुविधा मिळणे हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषदेनं या मागणीचा गांभीर्याने विचार करून पात्र झोपडपट्टीधारकांना तातडीने PMAY चा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा रवी सर्वगोड यांनी व्यक्त केली.
पंढरपूर शहरात घरकुल योजनेत मुस्लिम आणि मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी रवी बॉस सर्वगोड यांनी आज प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनाद्वारे दोन्ही समाजांतील घरकुलापासून वंचित असलेल्या कुटुंबांना तातडीने घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.
रवी बॉस सर्वगोड यांनी यावेळी सांगितले की, “संविधानानुसार सर्व समाज समान आहे, मग मुस्लिम व मराठा समाजाला घरकुल योजनेंतर्गत मागे का ठेवले जाते? शासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन दोन्ही समाजाला घरकुल मिळवून द्यावे.”
यावेळी त्यांनी हेही नमूद केले की, अनेक कुटुंबे अजूनही घरकुल योजनांपासून वंचित आहेत. शासनाने त्वरित उपाययोजना करून या कुटुंबांना घरकुल देण्याचे काम करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली
यावेळेस सतीश सर्वगोड, राजू सर्वगोड, प्रफुल्ल कांबळे, कृष्णा सर्वगोड, शौकत पठाण, लाल महमद शेख, साहिल तांबोळी, स्वप्नील कांबळे, राहील झारी, साहिल पठाण, तहा मणेरी, उमेश आगवणे, स्वप्नील सर्वगोड, भूषण सर्वगोड, रिहान शेख, रशीद तांबोळी, शरद सोनवणे, सिद्धनाथ सावंत, जुबेर बागवान, अमोल पाटील, सूरज साखरे आदी उपस्थित होते.पंढरपूर : मुस्लिम व मराठा समाजाच्या घरकुलासाठी रवी बॉस सर्वगोड यांचे निवेदन
1 टिप्पण्या
Good work
उत्तर द्याहटवा