Mumbai Weather Update: मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी महानगरपालिकेने एक क्रमांक जारी केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही प्रशासनाने केलं आहे.
Mumbai Rain: मुंबईत पावसाचं थैमान, पाण्यात अडकला तर काय कराल? BMC मदतीला धावणार, डायल करा हा नंबर
Mumbai Weather Update: मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी महानगरपालिकेने एक क्रमांक जारी केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही प्रशासनाने केलं आहे.
मुंबई: मुसळधार पावसाने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला झोडपले. मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे मुंबईतील जवळपास निम्मी मुंबई जलमय झाली होती. घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. तसंच रस्त्यावर वाहने अडकून वाहतूककोंडी झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पाणी शिरल्याने ‘बेस्ट’ बस गाड्याही बंद पडल्या. त्यामुळे महत्वाच्या कामानिमित्त सकाळीच घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. जागोजागी पाणी साचल्याने नालेसफाईची कामे नीट न होण्याबरोबरच महापालिकेच्या विविध उपाययोजना अपयशी ठरल्याने त्यांच्या कारभारावर सर्वच स्तरांतून टीकाही झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांच्या मदतीसाठी एक नंबर जारी करत मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन केले आहे
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. २० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी रेल्वे आणि BEST बस सेवा सुरळीत सुरू आहेत. BMC यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी सांगितले आहे.
"आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक सर्व उपाययोजना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात 1916 या मदतसेवा क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा," असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
0 टिप्पण्या