पंढरपूर नगरपालिका निवडणूक – चौकडीची लढत! परिचारक, धोत्रे, पाटील की आवताडे? जनता कोणाला देणार सत्ता?
पंढरपूर : आगामी नगरपालिका निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तेचा गड कोण जिंकणार? या प्रश्नावर सध्या पंढरपूर शहरात मोठी चर्चा सुरू आहे.
यंदा लढत त्रिकोणी नसून चौकडीची होण्याची चिन्हे आहेत – समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, अभिजीत पाटील आणि दिलीप बापू धोत्रे या चार दिग्गजांमध्ये जोरदार स्पर्धा रंगणार आहे.
✅ समाधान आवताडे – पैशाच्या जोरावर दमदार तयारी
आवताडे गटाकडे प्रचंड आर्थिक पाठबळ आहे. सोशल मीडिया कॅम्पेन, बॅनरबाजी, मोठे कार्यक्रम यावर भरपूर पैसा खर्च केला जात आहे. प्रचारात आवताडे गट आघाडीवर दिसतोय, पण फक्त पैशाच्या जोरावर जनता जिंकेल का हा प्रश्न कायम आहे.
✅ प्रशांत परिचारक – रणनीतीचा बादशहा
प्रशांत परिचारक हे पंढरपूरच्या राजकारणातील अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्याकडे अजूनही जुने नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे. डावपेच रचण्यात ते पारंगत आहेत, आणि या ताकदीमुळे त्यांची गणिते मजबूत दिसत आहेत.
✅ अभिजीत पाटील – माणुसकी आणि वाढता इंटरेस्ट
गेल्या काही दिवसांत अभिजीत पाटील यांनी पंढरपूरमध्ये मोठा इंटरेस्ट दाखवला आहे. सामाजिक कार्यक्रमात सहभाग, कार्यकर्त्यांशी गाठीभेटी आणि सोशल मीडियावर सक्रियता यामुळे त्यांची प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे. क्लीन इमेज + जिव्हाळ्याचं नातं ही त्यांची मुख्य ताकद आहे.
✅ दिलीप बापू धोत्रे – दमदार आणि प्रभागातील मजबूत पकड
धोत्रे हे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. नगरपालिका लढवण्यासाठी ते तयार असल्याचं संकेत आहेत, आणि त्यांचा प्रभाव काही प्रभागात खूप मजबूत आहे. जनतेशी थेट संपर्क आणि अनुभवी कामकाजामुळे ते स्वतंत्र खेळाडू ठरण्याची शक्यता आहे.
जनतेचा मोठा प्रश्न
👉 “पैसा, बुद्धी, माणुसकी की स्थानिक पकड – कोणावर जनता विश्वास ठेवणार?”
👉 “नगरपालिकेचा गड कोणाकडे जाणार?”
0 टिप्पण्या