पंढरपूर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येथे येतात.
शहरात प्रवेश करताना रस्ते ठीक वाटतात, पण एकदा आत शिरल्यानंतर चित्र पूर्णपणे बदलते.
आतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत, ज्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो.
याचदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाजवळील मोठा चेंबर हा धोका बनला आहे.
या भागात भाविकांसाठी मोठ्या वाहनांची पार्किंगची सोय केलेली आहे, पण या चेंबरचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
यातील सापळे वाकले आहेत, आणि जर लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.
स्थानिक नागरिक सांगतात की, शहरातील लोकांना याची कल्पना आहे, पण बाहेरून आलेल्या भाविकांना हा धोका लक्षात येत नाही.
त्यामुळे अपघात झाल्यास जिम्मेदार कोण? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.
हे माझ्या विठुराया, उघड लवकर शासनाचे डोळे... मग दिसेल पंढरीतील लोक भोळे!
‘पंढरी नगरी स्वर्ग समान’ असे म्हटले जाते, पण या खड्ड्यांमुळे आणि चेंबरमुळे भक्तांना नर्कसमान त्रास होत आहे.
प्रशासन कधी जागे होणार? हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या