पंढरपूरमध्ये मोकाट जनावरांचा धुमाकूळ – धारक त्रस्त, मोठा अपघात होण्याची शक्यता!
पंढरपूर (प्रतिनिधी):
शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः मुख्य रस्ते, बाजारपेठ, आणि निवासी भागात ही जनावरे उभी राहत असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय.
सकाळ-संध्याकाळ कामावर जाणाऱ्या धारकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
काही ठिकाणी जनावरे रस्त्यावर अचानक धावत येत असल्यामुळे दोन चाकी वाहनस्वारांचा तोल जातोय, तर अनेकजण जखमी होण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “कधी तरी मोठा अपघात घडेल” अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा प्रश्न आहे की, “नगरपालिका प्रशासन नेमके काय करतंय?”
मोकाट जनावरांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अन्यथा येत्या काळात आंदोलने करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
👍 तुमचे मत काय? मोकाट जनावरांवर कडक कारवाई व्हायला हवी का?
कमेंटमध्ये
नक्की कळवा…
0 टिप्पण्या