पंढरपूर शहरात गणेशोत्सवाच्या स्वागताची लगबग सुरू झाली असून बाजारपेठेत भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह, आनंद आणि भक्तीभाव स्पष्टपणे दिसत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’च्या जयघोषात बाजारपेठ दुमदुमून गेली आहे.
गणेशमूर्तींच्या बाजारात विविध प्रकारच्या मूर्तींची रेलचेल पाहायला मिळत आहे. लहान मूर्तींपासून ते मोठ्या दिमाखदार मूर्तींपर्यंत सर्व उपलब्ध आहेत. यामध्ये आधुनिक कलाकुसरीसह पारंपारिक स्वरूपाच्या मूर्तींनाही मोठी मागणी आहे. आकर्षक रंगसंगती, नैसर्गिक रंगांचा वापर, आणि देखण्या सजावटीमुळे प्रत्येक मूर्ती भक्तांच्या मनाचा ठाव घेत आहे.
मूर्तिकारांनी देखील मागणी लक्षात घेऊन नवीन डिझाईन्स सादर केली आहेत. पर्यावरणपूरक मूर्तींना यंदा विशेष मागणी असल्याचे स्पष्टपणे जाणवते. अनेक भक्त प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या मूर्ती घेण्यावर भर देत आहेत.
याशिवाय बाजारात गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठी खरेदी सुरू आहे. हार-फुले, आरास साहित्य, लाईट डेकोरेशन आणि पारंपारिक वस्तूंच्या दुकानातही मोठी वर्दळ आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्येही समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे.
गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पार्किंगची सोय आणि सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांकडून खबरदारी घेतली जात आहे.
गणेशोत्सवाच्या आगमनामुळे पंढरपूर शहर भक्ती आणि उत्साहाने न्हाऊन निघाले आहे. घराघरात बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!
.............................................................................................
जाहिरातीसाठी संपर्क: मो 8788983361
0 टिप्पण्या