धक्कादायक घटना: वाढदिवसाचा आनंद क्षणात शोकांतिका – वसईत इमारत कोसळली; आईचा मृत्यू, वडील ढिगाऱ्याखाली अडकले!
मुंबई | वसई:
वाढदिवसाचा आनंद क्षणात काळामध्ये बदलला. चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्त सगळे जमले होते, केक कापला, हसणं-खेळणं सुरू होतं, पण काही क्षणांतच आनंदाचे अश्रू दुःखात परिवर्तित झाले. कारण ज्या घरात साजरी होत होती ही आनंदाची रात्र, त्याच घराची चार मजली इमारत कोसळली.
ही हृदयद्रावक घटना मुंबईजवळील वसई येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंटमध्ये घडली. ही इमारत चामुंडानगर आणि विजयनगर यांच्या दरम्यान स्थित होती. काल रात्री उशिरा या इमारतीचा मागील भाग अचानक कोसळल्याने एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला.
घटनेचा थरार
चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्त नातेवाईक आणि मित्र आले होते.
अचानक जोराचा आवाज झाला आणि संपूर्ण इमारतीचा मागचा भाग जमीनदोस्त झाला.
आईचा जागीच मृत्यू झाला, तर वडील अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले असल्याची भीती व्यक्त केली जाते.
बचाव कार्य सुरू – 11 जणांची सुटका
घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या दोन पथका घटनास्थळी दाखल झाली आहेत. रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेत आतापर्यंत 11 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना विरार आणि नालासोपारा येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पालघर पोलिसांनी दिली .
0 टिप्पण्या