पंढरपूर कॉरिडॉरसाठी ऑक्टोबरपासून भू संपादन
दुकानांसाठी ४० हजार तर घरांसाठी २२ हजार प्रती चौ.फु. दराचे नियोजन, एमआयडीसी अधिकाऱ्यांची चाचणी घेऊन आयटी पार्कसाठी शासकीय जमिन उपलब्ध विमानतळासाठी वनविभागास पर्यायी जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी कुमार आशीर्वाद यांची माहिती
सोलापूर: पंढरपूर कॉरिडॉरसाठी लवकरच येत्या ऑक्टोबरपासून
भू संपादन करण्याचे नियोजन असून बाहेर हद्दीत होणाऱ्या दुकानांसाठी ४० हजार रुपये प्रती चौ.फुट आणि घरांसाठी २० ते २२ हजार रुपये प्रती चौ.फुट इतका मोठा मोबदला देण्याचे विचार सुरू आहेत. सोलापुरात आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून ती जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कुंडल सोलापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरसभेत भाषणात पाटबंधारे प्रशासकांना सांगितले होते की, सोलापुरात आयटी पार्कची योग्य ती जागा द्यावी.
मुख्यमंत्रीच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात कामाला लागले असून एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसह बैठका घेऊन आयटी पार्कसाठी शासकीय जमिनीचा शोध घेतला जात आहे. विमानतळासाठी वनविभागाच्या जमिनीचे पर्यायी स्थलांतर करून भू संपादन करावे लागेल आणि त्यासाठी एक महिन्याचा कालावधी जाईल.
पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर ५८० मीटर लांब आणि २३ मीटर रुंद असा कॉरिडॉर उभारण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या ऑक्टोबरपासून भू संपादनाचे नियोजन आहे. यासाठी ६४२ कुंटुं (कुटुंबांसाठी) तीन हजार कोटी खर्च येणार असून
बाहेर होणाऱ्या मिळकतींना मोठा मोबदला दिला जाणार आहे. दुकानांसाठी ४० हजार रुपये प्रती चौ.फुट आणि घरांसाठी २० ते २२ हजार रुपये प्रती चौ.फुट इतका मोठा मोबदला देण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. हॉटेलकर आणि शिंदे बंधूंना जतन करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूला वाहनतळ उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी पंचनामे
सुरू असून ३२ हजार शेवकऱ्यांची बाहेर असून लवकरच मदत शासानकडून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर-धाराशिव रेल्वे भू संपादनासाठी सुमारे १४९ कोटींचा पंचनाम्यात अतिरिक्त मोबदला मिळाला असून, त्यात काही रक्कम वाटप करावयाचा आला आहे.
याबाबत चौकशी समितीकडून प्राप्त झालेला अहवाल लवकरच राज्य शासानकडे प्रधान सचिवांना पाठविण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
बार्शीत येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३३ हेक्टर जागा वनविभागाची आहे. ही जागा नेमकी निश्चित करण्यात येत आहे. त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी बदलून याच ठिकाणी विमानतळ महाराष्ट्र शासनाच्या योजनेत आहे. खासदारांच्या बैठकीत सुचविलेल्या वनविभागाच्या प्रमुखांना प्रस्ताव पाठवून तीन दिवसांत पाठविण्याचे काम असून ते लवकरच जिल्हाधिकाऱ्यांनी यावे असे
सांगितले.
0 टिप्पण्या