राज्यातील विविध ठिकाणी या तलवारीचे प्रदर्शन होणार

 

"आपल्या गौरवशाली इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याचे कार्य सुरू!"


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'सेनासाहिबसुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीच्या प्रदर्शना'चे उदघाटन व लोकार्पण केले. 


सेनासाहिबसुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीला महाराष्ट्रामध्ये आणून आपण आपल्या गौरवशाली इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका पार पाडली आहे. या तलवारीमुळे समाज इतिहासाशी अधिक घट्टपणे जोडला गेला आहे. नागपूरसह राज्यातील विविध ठिकाणी या तलवारीचे प्रदर्शन होणार असून, त्यामुळे हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा झाला, हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल. नागपूरकर भोसले घराण्याचा समृद्ध इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.


युनेस्को मान्यताप्राप्त 12 किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे अशा विविध ऐतिहासिक वारशांद्वारे आपण आपल्या इतिहासाशी पुन्हा जोडले जात आहोत. हा दैदिप्यमान इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सांस्कृतिक विभागाचे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मराठा साम्राज्याच्या खुणा, वस्तू आणि वारसा परत मिळवण्याचे आपले प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हजारो ऐतिहासिक वस्तू भारतात परत आणण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्राचाही वारसा परत आणला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.


यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत राजे मुधोजी भोसले, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार संजय उपाध्याय, आमदार श्रीकांत भारतीय व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या