ब्रेकिंग न्यूज : पंढरपुरात कोयत्यांची दहशत – कालिका देवी चौकात पुन्हा हल्ला
पंढरपूर शहरात कोयत्यांच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. कालिका देवी चौकात आज पुन्हा एकदा कोयत्याने हल्ला झाला आहे. दुपारच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने प्राणघातक वार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांत शहरात कोयत्याचा वापर करून गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले
आहे.
0 टिप्पण्या