पंढरपूर मध्ये एका फेमस शाळेमध्ये काळाबाजार चालू

 


पंढरपूरच्या नामांकित शाळेत काळाबाजाराचा पर्दाफाश; गोरगरीब पालकांच्या आशांना तडा, "दोन दिवसांत सर्व सत्य बाहेर येणार"


पंढरपूर शहरातील एका नामांकित शाळेत काळाबाजार सुरू असल्याचा मोठा प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असते, पण इथे मात्र गैरव्यवहारांच्या सावल्या दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवेश प्रक्रियेत अनियमितता, काही विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यासाठी संगनमत, तसेच शैक्षणिक प्रक्रियेत बेकायदेशीर मार्गांचा अवलंब केला गेल्याचे आरोप झाले आहेत.


गोरगरीब पालक व शेतकरी विद्यार्थींवर अन्याय


या सर्व प्रकरणात सर्वात मोठा फटका गोरगरीब पालक आणि शेतकरी कुटुंबातील मुलांना बसत आहे. शेतकरी वर्ग आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून कष्ट करतो, पण बेकायदेशीर पद्धतींनी त्यांच्या मुलांचे स्वप्न चुरडले जात आहे. “शिक्षण हे सर्वांसाठी समान असावे, पण पैशांच्या बळावर हा व्यवहार चालत असेल, तर संविधानातील समान संधीचा हक्क धोक्यात आला आहे,” अशी पालकांची तीव्र प्रतिक्रिया आहे.


पत्रकार कट्टा चॅनलचा निर्धार – दबाव कितीही आला तरी सत्य बाहेर 


पत्रकार कट्टा या न्यूज चॅनलने हे सर्व प्रकार जनतेसमोर आणण्याचा निर्धार केला जाहीर केले आहे –

“दोन दिवसांत काळाबाजाराचा प्रत्येक पैलू उघड होईल.   यासाठी संपूर्णपणे दबाव कितीही आला तरी आम्ही गप्प बसणार नाही. संविधानाने दिलेला अधिकार वापरून सत्य बाहेर आणणारच.”


दोन दिवसांत मोठा भांडाफोड; शिक्षणावरील प्रश्नचिन्ह


दोन दिवसांत या काळाबाजाराशी संबंधित सर्व पुरावे आणि माहिती जनतेसमोर येणार आहे. या घटनेमुळे शिक्षणातील प्रामाणिकतेवर मोठा प्रश्न उभा राहिला आहे आणि समाज विचार करत आहे –

"शिक्षण हे विद्या आहे की उध्वस्त आहे?"

सत्यमेव जयते याचा अर्थ जनतेसमोर आणणारच 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या