पंढरपूर :
ईद मिलादुन्नबीच्या १५०० व्या जश्नानिमित्त टीपू सुलतान बॉईज यांच्या तर्फे मक्का मशिदीच्या मागील हॉलमध्ये हिजामा कॅम्प आयोजित करण्यात आला.
सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडलेल्या या कॅम्पला पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हिजामा हे पैगंबरांच्या सुन्नतीतून आलेले आणि आजारांवरील परिणामकारक उपचारपद्धती म्हणून ओळखले जाणारे वैद्यकीय साधन आहे.
रक्तातील विकार व अनेक व्याधींवर प्रभावी उपाय म्हणून याकडे पाहिले जाते.
"हिजामा हे सुन्नत देखील आणि इलाज देखील" असा संदेश या कॅम्पमधून देण्यात आला.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शंभराहून अधिक हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन या कॅम्पमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
दोन्ही समाजघटकांनी उपचार घेतले व एकमेकांना प्रोत्साहन दिले.
या माध्यमातून केवळ आरोग्यदायी जीवनाचा संदेशच नाही तर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण पंढरपूरकरांसमोर आले.
माणुसकीचा संदेश देत धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचा संगम घडवणारा हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
सुन्नत जिवंत ठेवणे, आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे आणि समाजात ऐक्याचे वातावरण निर्माण करणे हे तिन्ही उद्देश या कॅम्पद्वारे यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
👉 पंढरपूरमध्ये आयोजित हिजामा कॅम्प हा आरोग्य, सुन्नत आणि समाजएकतेचा संगम ठरला, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या