खरोखरच का असे आहे का

 


सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांकडून समाजाच्या विविध क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य – मुख्यमंत्री फडणवीस


पुणे :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुणे येथे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उदघाटन व कोनशिला अनावरण सोहळा संपन्न झाला. 

या कार्यक्रमात ‘सीओईपी अभिमान’ पुरस्काराने माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सीओईपीसारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या योगदानामुळे राज्य व देशाला अनेक प्रथितयश व्यक्तिमत्वे मिळाली आहेत.

 समाजाच्या विविध क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांनी केले आहे.”


सीओईपीच्या गौरवपूर्ण परंपरेचा उल्लेख करताना ते म्हणाले की, 2028 साली संस्थेची 175 वर्षे पूर्ण होणार असून, ही संस्था तंत्रज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्वपूर्ण कामगिरीमुळे देशात वेगळी ओळख निर्माण करत आहे. 

शासन संस्थेच्या विस्तारासाठी जागा उपलब्ध करून देत असून, संशोधन व नवकल्पना यांना चालना देण्यासाठी आवश्यक निधी देण्याची हमीही त्यांनी दिली.


आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व क्वांटम कम्प्युटिंगमुळे जग वेगाने बदलत असल्याचे सांगत, फडणवीस म्हणाले की, “डॉट कॉम बूमप्रमाणेच भारत पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध करून जगावर छाप पाडू शकतो. 

यासाठी योग्य पावले उचलण्याची गरज आहे.”


मुख्यमंत्री यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियांत्रिकी महाविद्यालयांनी व तंत्रज्ञान विद्यापीठांनी कुशल मानव संसाधन तयार करण्याची जबाबदारी पार पाडावी, असेही सांगितले.


नवीन शैक्षणिक धोरणामुळे मोठे परिवर्तन सुरु असल्याचे नमूद करताना फडणवीस म्हणाले की, इनोव्हेशनसाठी स्वायत्तता आवश्यक आहे. राज्य सरकारचा मानस अधिकाधिक संस्थांना स्वायत्तता देण्याचा आहे.


कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील व इतर मान्य

वर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या