परत एकदा गेम होणार का?

 


पुण्यात अजित पवारांचा दमदार इशारा; महायुतीला आव्हान, राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची तयारी


पुणे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवणार 

असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून स्वबळाची चाचणी सुरू असल्याचे समजते.


पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. आज पुण्यात झालेल्या 

महत्त्वपूर्ण बैठकीत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या. “प्रभाग रचनेच्या विरोधात कोर्टात जाणार नाही, त्यामुळे लढण्यासाठी सज्ज व्हा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या सूचनांमुळे महायुतीला मोठे आव्हान उभे राहू शकते. अजित पवारांनी भाजपला धक्का देण्याचा इशारा दिल्याने पुण्यातील राजकीय समीकरणात चुरस निर्माण झाली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना ताकदीनं काम करण्याचे आदेश दिले आहेत आणि पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.


मुख्य ठळक मुद्दे:

महायुती एकत्र लढणार; पण अजित पवारांचा वेगळा प्लॅन?


पुण्यातील बैठकीत स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत.


प्रभाग रचनेच्या विरोधात कोर्टात जाणार नाही – अजित पवार.


भाजपला धक्का देण्यासाठी रा

ष्ट्रवादी सज्ज.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या