नवी दिल्ली :
देशाच्या करप्रणालीत ऐतिहासिक बदल घडवत, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेल्या ‘नवोन्मेषी जीएसटी सुधारणा’ आता प्रत्यक्षात अमलात आल्या आहेत.
जीएसटी परिषदेने केंद्र सरकारच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली असून, 22 सप्टेंबर 2025 पासून नवा जीएसटी ढाचा लागू होणार आहे.
काय बदल होणार?
➡️ पूर्वीचे दर – 12% आणि 28%
➡️ नवे दर – फक्त 5% आणि 18%
यामुळे सामान्य नागरिकांवरील करभार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. शेतकरी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), महिला उद्योजक, छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय यांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
काय मिळणार दिलासा?
👍 आरोग्य सेवांचा खर्च कमी – हॉस्पिटल व औषधांवरील खर्चात दिलासा
👍 उद्योग सुलभता वाढणार – व्यापार सोपा व जलद होणार
👍महिला व युवकांना प्रोत्साहन – स्टार्टअप्सना बळकटी
सरकारचा उद्देश
हा निर्णय देशातील नागरिकांचे आर्थिक सबलीकरण करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला नव्या गतीने पुढे नेण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
👉 मोदी सरकारचा दावा – “हा बदल ईज ऑफ डुइंग बिझनेस वाढवेल, उत्पादन वाढेल आणि रोजगार निर्मि
तीला गती मिळेल.”
0 टिप्पण्या