"पंढरपूरने दाखवली संस्कृतीची झलक; शासन नियमांचे काटेकोर पालन"

 


पंढरपूरमध्ये गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने, डॉल्बी-डीजेविना संपन्न


पंढरपूर :

पंढरपूर शहरात यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला. 

शासनाच्या सूचनांचे पालन करत सर्व गणेश मंडळांनी शिस्तबद्धपणे उत्सव साजरा केला. यावर्षी खास करून डॉल्बी आणि डीजेविना रॅली काढण्यात आली.


गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, टाळ-चिपळ्यांचा नाद आणि भक्तीगीतांच्या स्वरात भाविकांनी गणरायाला निरोप दिला. 

प्रशासन आणि पोलिस विभागाने आखलेल्या नियोजनाचे काटेकोर पालन झाले.


शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून शांततेत आणि धार्मिक वातावरणात गणेशोत्सव साजरा झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

सर्व गणेश मंडळांनी दाखवलेले सहकार्य व शिस्त पंढरपूरसाठी आदर्श ठरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या