वाल्मिक कराडचा नवा डाव! सरपंच हत्या प्रकरणात आरोपींकडून "D2 ऑपरेशन" सुरू

 


वाल्मिक कराडचा नवा डाव!


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून "D2 ऑपरेशन" सुरू असल्याचा निकमांचा आरोप


बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून खटला मुद्दाम लांबविण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आहे.

 जिल्हा व विशेष मकोका न्यायालयात आज झालेल्या सुनावणीला निकम स्वतः हजर होते.


निकम यांनी न्यायालयाचे लक्ष वेधत सांगितले की, आरोपी "D2 ऑपरेशन" राबवत आहेत.


D म्हणजे Delay the Trial (खटला लांबवणे)


D म्हणजे Derail the Trial (खटल्याला रुळावरून घालवणे)



आरोपींकडून वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळे अर्ज करून सुनावणी पुढे ढकलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष सरकारी वकीलांनी न्यायालयाला विनंती केली की, आरोपींकडून दाखल करण्यात आलेल्या दोषमुक्तीच्या अर्जांची लवकरात लवकर सुनावणी घ्यावी. 

न्यायालयाने यावर गंभीर दखल घेतली आहे.


या प्रकरणातील आरोपींना दोषमुक्त करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी, सरकारी वकीलांचा ठाम विरोध कायम आहे. 

त्यामुळे या हत्याकांड प्रकरणातील पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या