भीमा नदीला पूर सदृश स्थिती
पंढरपूरात पाणी शिरण्याच्या शक्यतेने ३० कुटुंबांचे रायगड भवन येथे स्थलांतर
उजनी धरणातून विसर्ग वाढला; पालिका, पोलिस आणि महसूल प्रशासन अलर्ट मोडवर
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
उजनी व वीर धरणातून १ लाख २६ हजार ३६० क्यूसेकचा विसर्ग
---
सखल भागातील सुमारे पाचशे नागरिकांच्या निवासाची नगरपालिकेकडून तयारी
या सुरक्षित ठिकाणी करण्यात आली व्यवस्था
संपूर्ण पंढरपूरात भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी व वीर धरणातून तब्बल १ लाख २६ हजार ३६० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पंढरपूरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने अलर्ट मोड सुरू केला आहे.
---
एकाच सूचनेत विस्थापित होणाऱ्या नागरिकांची तयारी
पंढरपूर नगरपालिकेने तत्काळ सखल भागातील नागरिकांना रायगड भवन येथे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास ३० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. सुमारे ५०० नागरिकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
---
उजनी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरूच
पावसाचे प्रमाण वाढल्याने उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सतत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या