मुंबई आणि लगतच्या इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाकडून पुढच्या काही तासांसाठी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मुंबई : महाराष्ट्रात राज्यभरात मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे सर्वत्र पाणी भरलं आहे. मुंबईची लाईफलाइन मानली जाणारी लोकल ट्रेन ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. रस्ते मार्ग पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे ठप्प झाले आहेत. दुपारी पावसाने थोडीसी उसंत घेतली होती. पण पावसाने पुन्हा रौद्ररुप धारण केलं आहे. हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची धाकधूक वाढली आहे. फक्त पाऊसच नाही. वारा देखील तितकाच वेगाने वाहत आहे.
भारतीय हवामान विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना पुन्हा एकदा हवामान विभागाकडून तीन तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी आणि त्यासोबत 40 ते 50 किलोमीटर प्रति तास किंवा 60 किलोमीटर प्रति तास वेग घेणारे वारे वाहण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे कोलमडली
मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका हा मध्य रेल्वेला बसलं आहे. मध्य रेल्वे सहा ते सात तासांपासून ठप्प झाली आहे. ठाणे, दादर, कुर्ला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली आहे. जो तो आपापल्या घरी जाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. पण लोकल ट्रेन बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ठाणे स्थानकांवरील प्रवाशांनी तर एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना टॉयलेटची देखील सोय नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे प्रवासी किती त्रासातून जात आहेत हे स्पष्ट होत आहे. फक्त मध्य रेल्वेच नाही तर हार्बर रेल्वे सेवा देखील ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वे सेवेलादेखील त्याचा
0 टिप्पण्या