मराठा आरक्षण जीआरनंतर ओबीसी नेत्यांची धावपळ, मुंबई ते नागपूरमधील महत्त्वाच्या 5 घडामोडी
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने मंगळवारी काढलेल्या जीआरवरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मंगळवारी सरकारने तीन महत्त्वाचे शासन निर्णय जाहीर केले. त्यानंतर ओबीसी संघटनांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागली.
आज दिवसभरात मुंबई ते नागपूरमध्ये ओबीसी संघटनांची धावपळ दिसून आली. काही ठिकाणी जीआर जाळण्यात आला.
तर, मुंबईत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले मनोज जरांगे यांचे उपोषण मंगळवारी संपले. राज्य सरकारने जरांगे यांच्या आठ पैकी 6 मागण्या मान्य केल्या.
मराठा-कुणबी दाखल्याबाबत महत्त्वाचा निर्णय उपसमितीने घेतला. आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी आझाद मैदान आणि परिसरात जोरदार आनंद साजरा केला.
मराठा आरक्षणाबाबत शासन निर्णय झाल्यानंतर आता ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले आहे.
जीआर जाळून ओबीसी संघटनांचा निषेध
मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरनंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अनेक ठिकाणी ओबीसी संघटनांनी शासन निर्णय जाळून निषेध व्यक्त केला.
राज्यात नवा राजकीय संघर्ष पेटणार का?
सरकारच्या निर्णयानंतर आता राज्यात नवा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ओबीसी नेत्यांचा संताप, मराठा आंदोलकांचा जल्लोष आणि सरकारचा अडचणींचा खेळ अजून
रंगणार आहे.
0 टिप्पण्या