पंढरपूरमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त K.G.N. ग्रुपचा सामाजिक उपक्रम – डॉल्बीमुक्त उत्सव आणि रक्तदान शिबिर
पंढरपूर : पैगंबर जयंतीनिमित्त या वर्षी K.G.N. ग्रुपने एक वेगळा आदर्श ठेवत फालतू खर्च आणि डॉल्बीच्या गोंधळाऐवजी समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून “रक्तदान हेच जीवनदान” या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे.
हे रक्तदान शिबिर दि. 05 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 09.00 वाजता ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत मक्का मजीत, पंढरपूर शहर येथे आयोजित करण्यात आले आहे.
आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या पवित्र दिवशी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान करून मानवतेसाठी आपला हातभार लावा.
“तुमचं रक्त एखाद्याच्या नसांमध्ये वाहील, आणि त्याचं जीवन वाचवेल – रक्तदान करा, कारण तुमच्यातील मानवतेला हीच खरी सलाम आहे!”
K.G.N. ग्रुपचे म्हणणे आहे की, पैगंबर जयंती साजरी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजोपयोगी कार्य करणे.
त्यामुळे फाजील खर्च, डॉल्बीचा आवाज आणि गोंधळ टाळून त्यांनी रक्तदानासारखा लोकहिताचा उपक्रम राबवला आहे.
“आपल्या एका थेंब रक्तामुळे एखाद्याचे जीवन वाचू शकते. म्हणून या पवित्र कार्यात सहभागी व्हा”, असे आवाहन आयोजकांनी
केले आहे.
0 टिप्पण्या