आजोबांनी नातवाचा घेतला जीव? लेकाच्या बदल्यासाठी नानापेठेत गोळीबार – संपत्तीच्या हव्यासामुळे पेटली वैराची आग
पुणे | नानापेठेत पुन्हा एकदा रक्तरंजित वारसा वैर उफाळून आले आहे. कोयता गँगचा दहशतवादी चेहरा पाहिलेल्या पुण्याने शनिवारी आणखी एका थरारक घटनेचा साक्षीदार झाला. वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला म्हणून त्याच्या भाच्याचा गोविंद कोमकर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीने कोमकरवर पार्किंगमध्ये थेट गोळीबार केला. ही घटना संपत्तीच्या वादातून पेटलेल्या शत्रुत्वाची परिणती असल्याची चर्चा आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येमागे गोविंदचे स्वतःचे आजोबा आणि वनराजचे वडील बंडू आंदेकर यांचा हात असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. लेकाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरांनी ही रचना केल्याची शंका व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यापासून या खुनाचा बदला घेतला जाणार असल्याच्या चर्चेला आता प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र समोर आले आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, या रक्तरंजित वादामागील खरा सूत्रधार कोण हे शोधणे हे आव्हान
ठरणार आहे.
0 टिप्पण्या