पंढरपूरमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर – हिंदू-मुस्लिम बांधवांनी दिला एकतेचा संदेश
पंढरपूर : पैगंबर जयंतीच्या निमित्ताने पंढरपूर येथे के.जी.एन. ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात तब्बल 67 जणांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग नोंदविला.
या उपक्रमात विशेष म्हणजे हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन रक्तदान केले आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून समाजाला सुंदर संदेश दिला.
हे रक्तदान शिबिर
आमदार समाधान दादा अवताडे तसेच उमेश मालक परिचारक आणि प्रणव मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाले.
या उपक्रमाला के.जी.एन. ग्रुपचे अध्यक्ष इमरान मणेरी यांच्यासह सुनील जी सर्वगोड, राजू सर्वगोड, रविभाऊ सर्वगोड, लाला पेंटर, इस्माईल बोहरी, कीर्तीपाल सर्वगोड, फारुख मणेरी, जुबेर तांबोळी, शकील मुलाणी, सईद सय्यद, मोसिन मणेरी, आमिर तांबोळी, जितू भांडेकर, असिफ आतार, रिया तांबोळी, सद्दाम तांबोळी, फरीद मुजावर, सचिन जाधव, वसीम तांबोळी, सुफियान मणेरी, मोईन तांबोळी, हुसेन तांबोळी, मुसा तांबोळी, सतीश सर्वगोड, मुसेब बागवान, मोहसीन बागवान आदी मान्यवरांनी हजेरी लावली.
"रक्तदान हेच जीवनदान" या संदेशासह, हिंदू-मुस्लिम बंधुतेचे अनोखे उदाहरण घालून देत या शिबिराने ऐक्याचा संदेश दिला.
0 टिप्पण्या