गुटखा, मावा शौकिनांना बुरे दिन; पोलिसांची करडी नजर
दोन लाख २३ हजाराचा गुटखा सुगंधी सुपारी जप्त
राज्यात गुटखा, सुगंधी सुपारी विक्रीवर बंदी आहे. तरीही कार्टूनमध्ये गुटखा, सुगंधी सुपारी आणून याची खुलेआम येथे विक्री केली जाते. पंढरपूरातील अक्कलकोट नाका परिसरात एका घरात गुटखा व सुगंधी सुपारी साठवून ठेवल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पहाटे धाड टाकून सुमारे २ लाख २३ हजार रुपयांचा गुटखा व सुगंधी सुपारी जप्त केला आहे. यामुळे जिभेवर चवखाऊ उठवणारे शौकिनांना बुरे दिन आल्याचे दिसून येत आहे.
छापा टाकणाऱ्या पोलिस अधिकारी प्रशांत ढगे यांनी गुटखा व मावा पंढरपूरात विक्री होत असल्याचे लक्ष केंद्रीत केले आहे. ढगे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, अक्कलकोट नाका येथे असलेल्या वसीम तांबोळी यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर गुटखा व सुगंधी सुपारी साठा आहे. त्यानुसार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तेथे छापा टाकला. या विक्रमी दोन लाख तेवीस हजार रुपयांचा गुटखा व सुगंधी सुपारी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी हा साठा जप्त केला असून यासंदर्भात वसीम तांबोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुटखा, मावा शौकिनांवर करडी नजर ठेवली असून त्यांना बुरे दिन आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे
0 टिप्पण्या