बापरे पंढरपूर मध्ये दिसला बिबट्या


 गोपालपुरात बिबट्या? वन विभागाकडून पाहणी

पंढरपूर : पंढरपूर पासून जवळच असलेल्या तीन किलोमीटर अंतरावरील गोपालपूर येथील एका शेतात बिबट्या सदृश्य प्राणी आढळून आला आहे. यामुळे शेतकऱ्यां व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


गोपालपूर येथील सूर्यभीं याच्या शेतामध्ये रात्री बिबट्या सदृश्य प्राणी दिसून आला याची माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के यांनी वन विभागाला दिली. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी गोपालपूर येथे धाव घेऊन पाहणी केली. तसेच त्यांनी बिबट्या सदृश्य प्राणी आढळल्याच्या ठिकाणी तपास केला आहे. पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांत बिबट्या सदृश्य प्राणी असल्याची चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर गोपालपूर येथे बिबट्या सदृश्य प्राणी आढळल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.


पंढरपूरपासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर गोपालपूर आहे. सावळी वन विभागाने तालुक्यात याची दखल घेऊन पाहणी केली. मात्र बिबट्या सदृश्य प्राणी असल्याचे वन विभागाने सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या